पांडुरंग मडकईकर उद्या भाजपवासी

0
104

कॉंग्रेसचे आमदार माविन गुदिन्हो व माजी आमदार बाबू आजगांवकर यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकून अनुक्रमे भाजप व मगो पक्षात प्रवेश करण्याच्या घटना ताज्या असतानाच पक्षाचे अन्य एक ज्येष्ठ नेते व कुंभारजुवेंचे आमदार पांडुरंग मडकईकर हे उद्या दि. २२ रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

उद्या दि. २२ रोजी होऊ घातलेल्या आपल्या भाजप प्रवेशाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे, असे पांडुरंग मडकईकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपणाबरोबर मतदारसंघातील सुमारे शंभर कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्षाचा त्याग का केला त्याचे उत्तर भाजपमध्ये प्रवेश करतानाच देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा साफ होतोय : लुईझिन
दरम्यान, पक्षातील नेते पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करू लागले आहेत त्यासंबंधी काल पत्रकारांनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांना विचारले असता हे नेते गेल्याने एका प्रकारे पक्षातील कचरा नाहीसा होऊ लागला असल्याचे सांगितले.