पर्वरीत अपघातात दुचाकीस्वार ठार

0
102

म्हापसा महामार्गावरील महिंद्रा शोरूमसमोर मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल दि. ५ रोजी रात्री ८.४५ वाजता आयशर ट्रकाने (एमएच ०७ एल ५६४२) वेर्णे येथून मुंबईला जात असताना महिंद्रा शोरूमसमोर त्याची धडक डिओ स्कूटर (जीए ०९ जे ३८७१) चालविणार्‍या मनजित बहादूर गार्टी (४०, मूळ नेपाळ) याला बसल्याने मनजित जागीच ठार झाला. हवालदार देवेंद्र काणकोणकर यांनी पंचनामा केला.

ट्रक चालक संतोष विश्राम तेली (परळ, महाराष्ट्र) आणि क्लिनर सिद्धेश संजय बंदरकर (बुबाडे, महाराष्ट्र) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.