पर्रा येथे चित्रीकरणावेळी फांदी पडून दिग्दर्शक ठार

0
125

पर्रा माडानी येथे एका सिनेमाचे चित्रीकरण चालू असून पथकाचे सदस्य नास्ता घेत असताना आंब्याच्या झाडाची फांदी पडून चित्रपटाचे साहाय्क दिग्दर्शक – व्यवस्थापक महेश माळी (४०) मूळ राजस्थान व सध्या मुंबईत राहणारे हे जागीच ठार झाले. ही दुर्घटना शनिवारी पहाटे ६.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. उपनिरीक्षक प्रशांत भगत यांनी सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वैद्यकीय अहवालात मानेवर फांदी पडून मान दुखावल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.