नीट प्रकरणी तोडगा काढा : कॉंग्रेस

0
111

नीट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून सरकारने याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे केली
आहे.
नीट परीक्षेसाठी अकरावी इयत्तेसाठी अभ्यासक्रम शिकावा लागतो. मात्र, जीईसीटीसाठी त्याची गरज नसल्याने गोव्यातील विद्यार्थी तो अभ्यासक्रम शिकलेले नाहीत. आता दोन दिवसांत तो अभ्यासक्रम विद्यार्थी कसे शिकतील, असा प्रश्‍न चोडणकर यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी होऊ घातलेल्या परीक्षेला बसू द्यावे, अशी मागणी चोडणकर यांनी या पत्रातून केली आहे.