पर्यटनमंत्र्यांच्या कारला अपघात

0
58

राष्ट्रीय महामार्गावर आगशी पोलीस चौकीजवळील कोर्तेस गॅरेजसमोरील रस्त्यावर महाराष्ट्रातील एका पर्यटन मिनिबसने पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांच्या कारला काल दुपारी पाठीमागून धडक दिली. यावेळी मंत्री कारच्या पुढच्या सीटवर बसले होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. एम. एच. – ४ – एङ्ग के – ४१५१ क्रमांकाची पर्यटक मिनिबस व पर्यटनमंत्री परुळेकर यांची डस्टर कार क्र. जी. ए. – ९ – जी – ९३३९ ही दोन्ही वाहने पणजीच्या दिशेने निघाली असता मागाहून येणार्‍या पर्यटक बसने मंत्र्यांच्या कारला धडक दिली.