इएस्‌जीला लोकायुक्तांची नोटीस

0
85

>> इफ्फी निविदेत कथित घोटाळा

 

इफ्फीसाठीच्या निविदा काढताना झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी काल गोवा लोकायुक्तांनी ईएस्‌जीला नोटीस जारी केली. या घोटाळ्यासंबंधी गोवा मनोरंजन सोसायटीने १३ डिसेंबर रोजी उत्तर द्यावे अशी सूचनाही लोकायुक्तांनी केली असून चौकशीसाठी १३ डिसेंबर ही तारीख निश्‍चित केली आहे.
मात्र, इफ्फी जवळ येऊन ठेपलेली असल्याने या निविदेवर तात्पुरती स्थगिती आणली जावी ही तक्रारदाराची मागणी लोकायुक्तांनी मान्य केलेली नाही. गोवा फॉरवर्ड या पक्षाचे एक पदाधिकारी दुर्गादास कामत यांनी याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवली होती. टीएल्‌जी इंडिया प्रा. लिमिटेड ह्या कंपनीला निविदा देताना अन्य नियम व अटीही धाब्यावर बसवण्यात आल्याचे लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले होते.