पणजी मनपाच्या महापौर, उपमहापौरांची उद्या निवड

0
154

पणजी महानगरपालिकेच्या नूतन महापौर, उपमहापौरांची उद्या मंगळवार दि. ३० मार्च रोजी निवड केली जाणार आहे. महापौरपदासाठी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर भाजपकडून अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार मोन्सेरात यांच्या गटाचे २५ उमेदवार निवडून आले आहेत. महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या गटातून निवडून आलेल्यामध्ये आमदार मोन्सेरात यांच्या समर्थकांचा भरणा जास्त आहे. निवडणुकीत भाजपचे निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्तेही निवडून आलेले आहे. त्यामुळे भाजपकडून महापौर आणि उपमहापौरपदी कुणाची वर्णी लावली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार मोन्सेरात यांच्या समर्थकांची महापौर आणि उपमहापौरपदी वर्णी लावण्याचा प्रस्ताव आहे. भाजपमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीवर विचारविनिमय केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.