पंतप्रधान युनोत हिंदीतून बोलणार

0
119

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदीतून भाषण करणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल दिली. अटल बिहारी वाजपेयी हे युनोत हिंदीतून बोलणारे पहिले भारतीय नेते होते याचीही सिंग यांनी हिंदी दिवस कार्यक्रमात आठवण करून दिली. मोदी हे विदेशी नेत्यांशी चर्चेवेळी हिंतीतूनच बोलतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान २७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघात बोलण्याची शक्यता आहे.