पंजाब लोक कॉंग्रेसचे २२ उमेदवार जाहीर

0
15

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रविवारी त्यांचा पक्ष पंजाब लोक कॉंग्रेसच्या २२ उमेदवारांची नावे जाहीर केली. पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार आहेत. २२ उमेदवारांपैकी २ माढा, ३ दोआबा आणि १७ मालवा विभागातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे.

उमेदवारांची यादी जाहीर करताना अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला. नवज्योतसिंग सिद्धू यांना निवडणूक जिंकू देणार नाही. ते पूर्णपणे अकार्यक्षम व्यक्ती आहेत, अशी टीका त्यांनी केली. अमरिंदर सिंग यांचा पक्ष ३८ जागांवर निवडणूक लढवत आहे. ते पहिल्यांदाच कॉंग्रेस सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत त्यांची भाजपशी युती आहे. पक्षाने यावेळी नऊ जाट शीख, चार दलित, तीन ओबीसी, पाच हिंदू व एका महिलेला उमेदवारी दिली आहे.