पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्याने राजीनामा : सिद्धू

0
95

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मौन तोडताना काल भाजप नेतृत्वावर खरमरीत टीका केली. पंजाबपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आल्यानेच आपण खासदारकीच्या त्याग केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी पंजाबपेक्षा मोठे दुसरे काही नाही. पंजाब माझे घर आहे, असे सिद्धु यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत विरोधक बुडाले. पण त्याच लाटेत मलाही बुडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मी आता शांत बसणार नाही. जिथे पंजाबचे हित असेल, तिथेच जाणार, असे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी त्यांनी उघडपणे कोणत्याही पक्षाचे नाव घेण्याचे टाळले. राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.