Home बातम्या न्याय संहिताप्रदर्शनाचे उद्घाटन

न्याय संहिताप्रदर्शनाचे उद्घाटन

0

गोवा पोलिसांनी कला अकादमीमध्ये आयोजित न्याय संहिता प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या हस्ते काल करण्यात आले. राज्यातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक व इतरांना न्याय संहितेची सविस्तर माहिती देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये गोवा राज्य देशात अग्रेसर आहे. नवीन प्रणालीमुळे गोव्यातील न्यायदान पद्धती अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे, असा विश्वास पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी व्यक्त केला.