नोटाबंदीविरोधातील मोर्चा संसदेकडे अडवला

0
69

>> मनीष सिसोदियांना अटक

 

नोटाबंदीविरोधात काल मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर निघालेला मोर्चा संसद मार्ग येथे अडवण्यात आला. तसेच यावेळी सिसोदिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृणमूल कॉंग्रेससोबतच आम आदमी पक्षानेही नोटबंदीविरोधात आपले आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये असून त्यांनी जनतेला या मोर्चात सहभागी होण्याचे ट्विटरवरुन आवाहन केले होते. दरम्यान आज, नोटबंदीविरोधात तृणमुल कॉंग्रेस जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार आहे.
चौथ्या दिवशी संसद ठप्प
नोटबंदीच्या विरोधामुळे चौथ्या दिवशी संसद ठप्प झाली. राज्यसभेत पंतप्रधानांना बोलावण्याच्या मागणीवर विरोधकांनी
मोदींविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे कोणत्याही कामकाजाविना संसदेची दोन्ही सभागृहे ठप्प होती.
नोटबंदीवर दिल्लीत सुनावणी व्हावी
नोटबंदीवर देशभर दाखल याचिका दिल्लीत स्थलांतरित करा. सुनावणी सुप्रीम कोर्ट किंवा दिल्ली हायकोर्टाने करावी, अशी विनंती केंद्राने सुप्रीम कोर्टाला केली. याबाबत कोर्ट आज दि. २३ नोव्हेंबरला सुनावणी
करेल.