नोटाबंदीवर पंतप्रधानांनी जनतेकडून मत मागवले

0
68

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून मते मागवली आहेत. नरेंद्र मोदी ऍपवर सर्वेक्षणाच्या माध्यमातून १० प्रश्न विचारण्यात आले असून त्यावर जनतेला आपले मत नोंदवायचे आहे. सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या दहा प्रश्नांत भारतात काळा पैसा आहे असे तुम्हाला वाटते का? भ्रष्टाचार आणि काळा पैसा याविरोधात लढले पाहिजे आणि त्याचे समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे असे तुम्हाला वाटते का? काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत तुम्हाला काय वाटते? भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांबाबत तुम्हाला काय वाटते? ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते? नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवाद कमी होण्यास मदत होईल असे आपल्याला वाटते का? नोटा रद्द केल्यामुळे घरखरेदी, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा सामान्य माणसाच्या आवाक्यात येतील? भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट नोटांविरोधातील आमच्या या लढ्यामुळे तुमची गैरसोय झाली का? भ्रष्टाचारविरोधी काही कार्यकर्ते आता भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवादाच्या समर्थनार्थ लढत आहेत असे तुम्हाला वाटते का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्हाला काही सूचना, कल्पना किंवा विचार सुचवायचे आहेत का? यांचा समावेश आहे.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांनी उत्तरे मागवली आहेत. अंमलबजावणी अधिक बळकट कशी करता येईल याबाबतही त्यांनी जनतेकडून अभिप्राय मागवला आहे.