पोरयेभाट वेर्णा येथील चिंचोणे येथे राहणार्या मेलवीन व्हिक्टर बार्रेटो याने मडगाव पोलीस स्टेशनवर पहिली तक्रार नोंदवली. त्यानंतर दुपारपासून सुमारे शंभर तरुणांनी तक्रारी नोंदवल्या.
राजकुमार याने जुन्या बाजारातील जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील मिडास टच इमारतीत आर. के. टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स नावाने कार्यालय उघडले होते. जाहिरातीही प्रसिद्ध केल्या होत्या. त्याने मोफत व्हिसा व विमान तिकिटे मिळवून देण्याचेही आमिष दाखवले व प्रत्येकाकडून २७ हजार ५०० रु. आगावू रक्कम म्हणून घेतले. नंतर त्याने सर्वांना सिंगापूरला जाण्यासाठी मुंबईला बोलावले. मात्र मुंबईत गेलेल्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला असता राजकुमार फोन उचलत नव्हता शिवाय कचेरीतही तो सापडत नव्हता. शेवटी मुंबईत गेलेल्यांना कळून चुकले की त्यांची फसवणूक झाली आहे. नंतर ते गोव्यात परतले व मडगावच्या कचेरीत जाऊन आगावू घेतलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. मात्र तिथेही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. तक्रारीनंतर उपनिरीक्षक रवी देसाई यांनी सदर कार्यालयात जाऊन पाहणी केली तसेच तेथील कर्मचार्यांना बोलावून आणून चौकशी केली.