नेरुलमध्ये अपघातात एक ठार, एक जखमी

0
89

नेरुल ङ्गट्टावाडा येथे इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर एक किरकोळ जखमी झाला. यात पोलिसांनी कारचालकास अटक केली आहे.

काल सोमवार दि. १९ रोजी दुपारी २.२५ वाजता नेरुल ङ्गट्टावाडा येथे इनोव्हा टॅक्सीने (जीए ०३ एन९६९८) समोरून येणार्‍या बुलेट मोटारसायकलला (जीए ०३ एन ३३३०) धडक दिली. यात दुचाकीस्वार पर्यटक अजीझ मलकापुरवाला (मुंबई, २१) आणि मागे बसलेला हुसेन गाडीवाला (२१) हे जखमी झाले. दोघांना गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल केले असता अजीझ याला डॉक्टरांनी मृत घोषित
केले.
हवालदार जॉर्ज मार्टीन यांनी अपघाताचा पंचनामा केला आणि इनोव्हा टॅक्सी चालक शंकराप्पा रायर (पर्वरी, २५) यास ताब्यात घेतल व त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.