जुन्या नोटांत पाच हजारांवरील रक्कम एकदाच बँकेत भरता येईल

0
90

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अधिसूचनेनुसार यापुढे येत्या ३० डिसेंबरपर्यंत पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांतील ५ हजार रुपयांवरील रक्कम केवळ एकदाच भरता येईल. पुन्हा पाच हजारांहून अधिक रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करायची असल्यास त्याबाबत तिघा बँक अधिकार्‍यांपुढे हे पैसे आधी का भरले नाहीत त्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल. हे स्पष्टीकरण समाधानकारक असेल तरच ते पैसे स्वीकारले जातील.

करबुडव्यांसाठी नुकत्याच काढण्यात आलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला ही अधिसूचना लागू होणार नाही. या योजनेखाली काळा पैसा पांढरा करू पाहणार्‍यांना पन्नास टक्के कर भरून उरलेल्या रकमेला चार वर्षे बिनव्याजी ठेव रूपात ठेवावे लागते.