नियोजित हेलिकॉप्टर प्रकल्पाचा  शक्यता अहवाल तयार करा

0
102

केंद्र सरकारची कंपनीला सूचना
गोव्यात हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी शक्य आहे का, याचा अभ्यास करण्याचे आदेश केंद्र सरकारने हिंदुस्थान एरोनॉटिक्स ली. या कंपनीला दिले असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे दिली.
संरक्षणमंत्री म्हणाले, की हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्पाविषयीचा प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर संरक्षण मंत्रालयाला सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. राजधानी पणजीत सैन्य दलाच्या ताब्यात असलेल्या जागेमुळे एखादा लोकहितार्थ प्रकल्प रखडत असल्यास सदर जागा गोवा सरकारच्या ताब्यात देण्यासाठीसंबंधीचा प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठविण्यात सांगण्यात येणार असल्याचे पर्रीकर यावेळी गोव्यातील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
याविषयी पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळेकर यांना प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. कला अकादमीसमोरील मिलिटरी इस्पितळ असलेली जागा लोकोपयोगी प्रकल्पासाठी योग्य असून त्याऐवजी सैन्य दलाला पर्यायी जागा देता येईल असे पर्रीकर यावेळी म्हणाले.
खाणींसाठीच्या पर्यावरण परवान्यांसंबंधीची ङ्गाईल केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयात मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे पर्रीकर एका प्रश्‍नावर म्हणाले.
दरम्यान, येत्या १०-१२ दिवसांत संरक्षणमंत्री सीमाभागांत भेटी देणार असून मे महिन्यात सैन्यदलाच्या समस्या जाणून घेणार आहेत.