नियम उल्लंघन झाल्यास ५ ते ५० हजारांचा दंड

0
5

गोव्याच्या पर्यटन खात्याने काल काढलेल्या एका आदेशाद्वारे राज्यातील पर्यटनस्थळी उघड्यावर मद्य प्राशन करणे, खुल्या जागेत भांडी मांडून स्वयंपाक करणे, किनार्‍यावर वाळूमध्ये वाहने चालवणे, भीक मागणे आदी गोष्टींवर बंदी घातली असून, या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पर्यटन स्थळांवर कचरा करणे, हातगाड्यांचा वापर करून वस्तू विकणे, वस्तू विकत घेण्यासाठी पर्यटकांच्या मागे धावून त्यांना त्रास देणे, अनधिकृतपणे तिकिट काऊंटरऐवजी पर्यटनस्थळी कुठेही जाऊन जलक्रीडा व बोटींच्या सफरी आदींसाठीच्या तिकिटांची विक्री करणे, किनार्‍यावर मिळेल तेथे बेकायदेशीरपणे डेक-बेड, टेबल्स आदी परवानगी न घेता टाकणे यासाठी देखील दंड ठोठावण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला आहे.