Home बातम्या नायजेरियन नागरिकाकडून 2.53 कोटींचे ड्रग्ज जप्त

नायजेरियन नागरिकाकडून 2.53 कोटींचे ड्रग्ज जप्त

0

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शिवोली येथे छापा घालून एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्याच्याकडून 2.53 कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. अमली पदार्थ विभागाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर सापळा रचून संशयित विदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. चिगोजी इनोसेन्ट न्झेदिग्वे असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 2.53 कोटी रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.केवर येत्या 17 नोव्हेंबर 2025 रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.