नव्या प्राथमिक शाळांना प्रत्येकी ५ लाख द्यावेत

0
84

>>व्यवस्थापनांची मागणी
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत काल शिक्षण खात्याने बोलावलेल्या शाळा व्यवस्थापनांच्या बैठकीत सरकारने प्रती विद्यार्थ्यांमागे देऊ केलेल्या ४०० रुपयांबरोबरच नव्या प्राथमिक शाळांना एक रकमी मदत योजनेखाली प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची मागणी व्यवस्थापनांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट असे कोणतेही आश्‍वासन दिले नसल्याचे कळते. विद्यार्थी निहाय शिक्षक पद्धतीत बदल करण्याचीही मागणीही यावेळी करण्यात आली.
‘स्टाफ पॅटर्न’ शिक्षक पद्धती बदलण्याची मागणीही व्यवस्थापनाने केली आहे. सद्या पहिली ते चौथीपर्यंतच्या २० मुलांसाठी एक शिक्षक, २७ मुलांसाठी २ शिक्षक व ६३ मुलांसाठी ३ शिक्षक अशी पद्धत आहे. ही पद्धत योग्य नसून १५ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक, ३० विद्यार्थ्यांसाठी २ शिक्षक व ४५ विद्यार्थ्यांसाठी ३ व ६० विद्यार्थ्यांसाठी ४ शिक्षक अशी पद्धत ठेवण्याची सूचना व्यवस्थापनांनी केली. या मागणीस सर्वांनीच पाठिंबा दिल्याने त्यावर विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
प्रती विद्यार्थ्यांमागे ४०० रुपये देण्याच्या योजनेचा नव्या शाळांना विशेष फायदा होणार नाही, असे व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.