नव्या झुआरी पुलाची एक मार्गिका डिसेंबरपूर्वी खुली : नीलेश काब्राल

0
6

झुआरी नदीवरील नवीन पुलाच्या एका चौपदरी मार्गिकेचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून, भारक्षमतेची चाचणी सुरू केली जाणार आहे. त्यानंतर झुआरी पुलाचा एक चौपदरी मार्गिका येत्या डिसेंबर २०२२ पूर्वी वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली.

झुआरी पुलाची एक मार्गिका येत्या डिसेंबर २०२२ पूर्वी खुला करण्याची घोषणा आपण केली होती. त्यानुसार पुलाचा एक भाग काम डिसेंबरपूर्वी खुला केला जाणार आहे. पुलाच्या पूर्ण झालेल्या भागाचे डांबरीकरण करण्यात आले असून, आता भारक्षमतेची चाचणी होणार आहे. झुआरी पुलाच्या दुसर्‍या भागाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असून, हा दुसरा भाग २०२३ मध्ये पूर्ण केला जाणार आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.