नवज्योत सिध्दूंचा भाजपला रामराम

0
96

‘आवाज-ए-पंजाब’ या आघाडीची स्थापना केलेल्या क्रिकेटपटू राजकारणी नवज्योत सिध्दू यांनी काल भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा रितसर राजीनामा भाजपाध्यक्ष अमित शहा यांना सादर केला. भाजपचे पंजाब प्रभारी झा यांनी सिध्दूंचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे पत्रकारांना नवी दिल्लीत सांगितले.

भाजपच्या पंजाबमधील आमदार असलेल्या सिध्दू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी आपणही लवकरच त्यांच्यासोबत जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यामुळे सिध्दू पती-पत्नी आता पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या नव्या पक्षातर्फे रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवज्योत कौर यावेळी म्हणाल्या की सध्या आवाज-ए-पंजाब ही एक आघाडी आहे. त्याचे पक्षात रुपांतर झाल्यानंतर प्रथम आपणही भाजपचा राजीनामा देऊन त्यात सामील होणार. भाजप आपल्याशी गैरवर्तन करीत असल्याचेही त्या म्हणाल्या.