नवज्योत सिंग सिद्धू यांच न्यायालयाससमोर आत्मसमर्पण

0
29

पंजाब कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी काल पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. ३४ वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंगच्या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने १ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शुक्रवारी सकाळी नवज्योत सिंह सिद्धू यांनी न्यायालयाकडे आत्मसमर्पणासाठी वेळ मागितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सिद्धूंनी शुक्रवारी दुपारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. नवज्योत सिंह सिद्धू यांनी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर शुक्रवारी आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.