नगरसेवकांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार

0
8

राज्य सरकारच्या नगरपालिका संचालनानाने राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकांच्या नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या मानधन वाढीसंबंधी मसुदा जाहीर केला असून, त्यांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार आहे. गोवा नगरपालिका नियम 1970 मध्ये दुरुस्ती प्रस्तावाची सूचना जारी केली असून, या दुरुस्तीबाबत सूचना, हरकती 15 दिवसांत नगरपालिका संचालनालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारने यापूर्वी 2017 मध्ये नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व नगसवेकांच्या मानधनात वाढ केली होती.