राज्यातील 11 नगरपालिकांची नियोजित निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने जाहीर केलेली नगरपालिकांची प्रभाग फेररचना गोवा राज्य निवडणूक आयोगाने रद्दबातल केली आहे.
राज्यातील 11 नगरपालिकांची निवडणूक मे 2025 मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडा, सांगे आणि वास्को या 11 नगरपालिकांच्या प्रभागांची फेररचना जाहीर केली होती. तथापि, राज्य सरकारने गोवा नगरपालिका कायद्यात सुधारणा करणारा वटहुकूम जारी करून 11 नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलली आहे.
राज्य सरकारने नगरपालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे.