धारबांदोड्यातील अपघातात बिहारच्या युवकाचा मृत्यू

0
253

धारबांदोडा येथे एका भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने कारमधील एका बिहारच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. नववर्ष साजरे करण्यासाठी बिहारहून तिघे युवक गोव्यात कारने आले होते. मोले – उसगाव महामार्गावरील पेटके – धारबांदोडा येथे संजीवनी साखर कारखान्याजवळील रस्त्यावर एका झाडाला या कारची धडक बसून हा अपघात झाला. यात तिघा पर्यटकांपैकी निखिल प्रकाश (३४) हा ठार झाला. तर त्याचे अन्य दोघे मित्र सोनू कुमार (३०) व पंकज गौर (३३) हे जखमी झाले. त्यांना बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच ते नालंदा बिहारमधून गोव्यात आले होते व येथीलच जीए ०७ सी १२११ ही कार भाड्याने घेऊन ते कुळे येथील दूधसागरवर गेले होते. तेथून परतताना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. निखिल प्रकाश कार चालवत होता. अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून निखिलच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो मरण पावला. तेथून जाणार्‍यांनी व स्थानिकांनी जखमींना कारमधून बाहेर काढत धारबांदोडा आरोग्य केंद्रात दाखल केले असता निखिलचे निधन झाले. अन्य दोघाही जखमींना गोमेकॉत पाठवले आहे.

दिवजा सर्कलजवळील
अपघातात एक ठार
पणजी (प्रतिनिधी)
येथील मांडवी पुलाजवळील दिवजा सर्कलजवळ काल सकाळी झालेल्या एका अपघातात एका युवकाचे निधन झाले आहे. केदार लक्ष्मीधर राऊत (२८, ओरिसा) असे मयत युवकाचे नाव आहे. सदर युवक मोटर सायकलवरून जात असताना कचरावाहू वाहनाला धडक बसली. त्यात सदर युवक गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल केले होते.