Home Featured दोन वर्षांत 10 हजार सरकारी पदे भरणार

दोन वर्षांत 10 हजार सरकारी पदे भरणार

0

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> ताळगावात भाजप कार्यकारी मेळावा

पुढील दोन वर्षांच्या काळात राज्यात सुमारे 10 ते 12 हजार सरकारी पदे निर्माण करून ती भरली जातील, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल ताळगांव येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात तसेच भाजप नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलातना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, सार्वजनिक बांधकाम खात्यासह अन्य विविध सरकारी खात्यांत ही भरती होणार असल्याचे स्पष्ट करुन सुमारे 4 हजार पदे मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे भरली जाणार असल्याची माहिती दिली.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, राज्यातील युवा पिढीला नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेले कौशल्य प्रदान करण्यासाठी वेगवेगळे कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे युवा वर्गाला रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. अप्रेंटिशीप योजनेखाली राज्यातील सुमारे 15 हजार युवक युवतींनी कामाच्या अनुभव घेतला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी बोलताना ताळगांवच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांनी, डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गोव्याचा चौफेर विकास झालेला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतरही सावंत हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. ताळगांव मतदारसंघात 13 कोटी रु. खर्चून रस्त्यांचे हॉटमिक्सिंग झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मतदारसंघात लवकरच फुटबॉल मैदान होणार आहे. तसेच अन्य विकासकामेही वेगाने होणर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तीन पाकिस्तानी नागरिकांनी
गोवा सोडला ः मुख्यमंत्री

अल्पकालीन व्हिसा असलेले तीन पाकिस्तानी नागरिक यापूर्वीच गोवा सोडून गेले असल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपण दिलेल्या आदेशानुसार गोवा पोलिसांनी राज्यात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बदला घेतील. असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 121 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर केलेल्या ट्विटरमधून म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात कोंबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आलेल असून अनेकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

तीन पाकिस्तानी नागरिकांनी गोवा सोडला ः मुख्यमंत्री