कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील एका महिला कर्मचार्यावर दोघा महिला कैद्यांनी हल्ला केल्याी घटना काल घडली. नायजेरियन महिला जेनेट आणि घानाची महिला प्रिशाला या दोघींनी जयश्री वेंगुर्लेकर यांच्यावर हल्ला केला. जयश्री वेंगुर्लेकर या कारागृहाच्या मेट्रन आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ३५३, ३२३, ३४ कलमांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.