Home बातम्या दोन छाप्यांमध्ये ६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

दोन छाप्यांमध्ये ६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

0
अमली पदार्थविरोधी पोलिसांनी काल शापोरा, झरीवाडो येथे छापा मारून हॅन्स जोचिम निकोलाय (५६) या जर्मन नागरिकास अटक करून त्याच्याजवळील ५१ ग्राम एमडीएमए जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किमत ५ लाख १० हजार रु. एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून एक सॅमसंग मोबाईल व यामाहा स्कूटर (जीए-०३-एए-५९५१) ताब्यात घेण्यात आली.

उपनिरीक्षक थेरॉन डिकॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली ६ रोजी संध्याकाळी ६.१५ ते ९.३० या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, अन्य एका कारवाईत ५ रोजी अमली पदार्थविरोधी विभागाच्या पोलिसांनी आसगाव-बादे चॅपेलजवळ छापा मारून एका इस्रायली युवकाकडून २५० एसएलडी पेपर्स जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारत त्याची किमत १,२५,००० रु. एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव मेनाशे सासून (२८) असे आहे. उपनिरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.