औपचारिक घोषणा १८ रोजी
स्वतंत्र तेलंगण राज्यनिर्मितीच्या निर्णयाला विरोध करून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या एन. किरणकुमार रेड्डी यांनी अखेर नव्या पक्षाची स्थापना केली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा येत्या १८ रोजी केली जाणार आहे.
तेलगु लोकांच्या स्वाभिमान रक्षणासाठी नवा पक्ष स्थापन केल्याचे रेड्डी यांनी सांगितले. आपल्या राजकीय हेतूसाठी कॉंग्रेस व भाजप यांनी राज्याचे विभाजन केल्याचा आरोप त्यांनी केला. याचवेळी तेलगू देसम व वायएसआर कॉंग्रेस यांच्यावरही त्यांनी टीका केली.
दरम्यान, केंद्र सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन व स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीच्या घटनेची तारीख २ जून अशी निश्चित केली आहे. यामुळे यापुढे सीमांध्र व तेलंगण अशी स्वतंत्र राज्ये निर्माण होणार आहेत.
अनुक्रमे १३ व १० जिल्हे असलेली ही राज्ये असतील.