मंगळवारी दोनापावला येथे एन्आयव्हो सर्कलजवळ झालेल्या जेसीबी व स्कूटर अपघातात गोव्यात पर्यटनासाठी आलेली पुण्यातील महिला प्राजक्ता देशमुख (४७) यांचे निधन झाले.
रुपाली धर्पे (४७) व प्राजक्ता देशमुख या स्कूटरवरून चालल्या होत्या. रुपाली धर्पे या स्कूटर चालवत होत्या तर मयत प्राजक्ता देशमुख या मागे बसल्या होत्या. विरुध्द दिशेने येणार्या जेसीबीने त्यांच्या जीए- ०८ यू- ५७०२ या स्कूटरला धडक दिली असता दोघीही गंभीररीत्या जखमी झाल्या. पैकी प्राजक्ता देशमुख यांचे गोमेकॉत उपचार चालू असताना निधन झाले तर रुपाली धर्पे यांच्यावर उपचार चालू आहेत. जेसीबीचा चालक रिझवान अन्सारी हा फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.