Home बातम्या पाटणा स्फोटांचा तपास एनआयएकडे

पाटणा स्फोटांचा तपास एनआयएकडे

0

पाटणा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी काल तिसर्‍या संशयितास रांची येथून अटक करण्यात आली. दरम्यान, या स्फोटांचा तापस राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे सोपविण्यात आला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

तशी विनंती राज्यसरकारने केली होती असे ते म्हणाले. स्फोटप्रकरणी पाटणा येथून याआधी दोघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक इंडियन मुजाहिद्दिनचा हस्तक असल्याचे सांगण्यात आले होते.