दोघा पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान

0
126

भारतीय हद्दीत अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी घुसणार्‍या दोघा पाकिस्तानी घुसखोरांना काल पहाटे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबारात ठार केले. त्यांना शरण येण्यास सांगितले असता त्यांनी भारतीय सैनिकांच्या दिशेने गोळीबार केल्याने जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. रतन खुर्द येथील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीजवळ सीमेवरून हे दोन घुसखोर भारतीय प्रांतात घुसण्याच्या प्रयत्नात होते.