देशातील सक्रिय कोरोनाबाधित १० लाखांच्या खाली

0
127

देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांहून कमी झाली आहे. सध्या देशात ९ लाख ७३ हजार १५८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तसेच सलग गेल्या सात दिवसांपासून एक लाखांहून कमी कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात रविवारी दिवसभरात ७० हजार ४२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. गेल्या ७२ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३९२१ जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख १९ हजार ५०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.