देवेंद्र फडणवीस यांची गोवा भाजप प्रभारीपदी नियुक्ती

0
38

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गोवा प्रभारी म्हणून निवड केली आहे. ते भाजपचे गोव्यातील प्रमुख राज्य प्रभारी असतील. तर केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय रेल्वे आणि कपड राज्यमंत्री दर्शना जर्दोश ह्या राज्याच्या सहप्रभारी असतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी ही नियुक्ती केली आहे.

गोव्यात पुन्हा भाजपची
सत्ता : फडणवीस

राज्यातील भाजप सरकारने राज्याचा चांगला विकास केलेला असून त्यामुळे गोव्यात परत एकदा भाजपला सत्ता मिळेल, असा विश्‍वास कालच भाजपचे निवडणुकीसाठीचे गोवा प्रभारी म्हणून नियुक्ती झालेले देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर काल बोलताना फडणवीस यांनी वरील विश्‍वास व्यक्त केला.
गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही जाऊ आणि पुन्हा एकदा गोव्यात भाजहची सत्ता स्थापन करू, असे फडणवीस म्हणाले. भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

भाजपचे महाराष्ट्रातील नेते नेहमीच गोव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे येत्या गोवा विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे गोव्यातील भाजप नेत्यांना पूर्ण सहकार्य मिळेल, असे फडणवीस म्हणाले.