Home बातम्या देवतांविषयी अपशब्द; तिघांविरुद्ध तक्रार दाखल

देवतांविषयी अपशब्द; तिघांविरुद्ध तक्रार दाखल

0

गौतम खट्टर याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून हिंदू देवतांविषयी अपशब्द वापरले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परिणामी हिंदूंच्या धार्मिक दुखावल्या असून, या प्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात 3 जणांची नावे देण्यात आली असून, त्यांना येत्या दोन दिवसात अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेचे सत्यविजय नाईक यांनी काल दिला. गौतम खट्टर याने आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आता नाहक हिंदू धर्मीयांच्या देव-देवतांबद्दल अपशब्द वापरून धामृिक भावना दुखावल्या जात आहेत. धर्माबद्धल अपशब्द वापरून लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून 3 जणांना येत्या 2 दिवसांत अटक न केल्यास हिंदू बांधव रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे सत्यविजय नाईक यांनी सांगितले.