>> गोवा करणार ‘त्या’ विमान प्रवाशांची तपासणी
दुबईहून विमानाने गोव्यात आलेल्या व बेंगलोर विमानतळावर केलेल्या तपासणीत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलेल्या एका ६७ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या २६ विमान प्रवासांची यादी गोवा सरकारने तयार केली आहे. सदर महिला दि. ९ मार्च रोजी दुबईहून आली होती. त्या विमानाने प्रथम गोव्यात लँडिंग केले होते. यावेळी काही प्रवासी गोव्यात उतरले. तर काही प्रवासी बेंगलोरले गेले होते. बेंगलोरमध्ये गेलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली असता त्यातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे नंतर आढळून आले. त्यामुळे त्या विमानातून गोव्यात उतरलेल्या प्रवाशांमुळे राज्यात कोरोनाचा फैलाव होण्याची भीती लक्षात घेऊन सरकारने त्या विमानातून आलेल्या व गोव्यात उतरलेल्या २६ प्र्रवाशांची यादी तयार केली आहे. या प्रवाशांना वेगळे ठेवण्यात येणार असूनव त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील त्यांना १४ दिवस गोमेकॉतील कोरोना विभागात ठेवण्यात येईल असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.