दुचाकी वाहन कँटरला आग लागून ३० लाखांची हानी

0
109

>> ३५ दुचाक्या जळून खाक

 

गुडगाव या कंपनीतून मडगाव येथे घेऊन येणार्‍या ऍक्टिवा व इतर स्कुटरच्या कंटेनरला अंबाजी येथे आग लागून त्यातील ३५ स्कुटरी जळून खाक झाल्या. तर ३० स्कूटर्स अर्धवट जळाल्या. या आगीत ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.
गुडगाव येथील कारखान्यातून या दुचाक्या नुवे येथे राजी मोटर्स कंपनीला पाठविल्या होत्या. एचआर ५५ आर १७१६ या क्रमांकाच्या कंटेनरमधून ६५ दुचाक्या भरून पाठविल्या होत्या. काल दुपारी अंबाजी येथे कंटेनरला अचानक आग लागली. अग्नीशामक दलाला वृत्त देताच मडगाव येथून दोन व वेर्णा येथून एक अग्नीशामक बंब त्वरित आले व त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत कंटेनरच्या वरच्या कप्प्यातील ३५ स्कुटर्स पूर्णपणे जळाल्या तर खालच्या कप्प्यातील अर्ध्याअधिक जळाल्या. त्यात कंटेनरचेही नुकसान झाले. ही आग कशी लागली ते समजू शकले नाही.