दीनदयाळ योजनेत आता कोविड उपचारांचा समावेश

0
142

राज्य सरकारने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेत (डीडीएसएसवाय) दुरुस्ती करून कोविड उपचारांचा समावेश योजनेत करणारा आदेश काल जारी केला. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना खासगी इस्पितळांत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोविड उपचार डीडीएसएसवाय योजनेखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कोरोना उपचार डीडीएसएसवाय योजनेखाली आणण्याची घोषणा एप्रिल महिन्यात केली होती. या योजनेखाली सर्वसामान्य विभागासाठी प्रतिदिन ८ हजार रुपये शुल्क आणि व्हॅन्टीलेटरसह आयसीयू विभागासाठी प्रतिदिन १९ हजार २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या योजनेखाली रुग्णांचा इस्पितळात भरती झाल्यानंतरचा जास्तीत जास्त दहा दिवसांचा खर्च उचलला जाणार आहे. डीडीएसएसवाय योजनेखाली नोंदणी असलेल्या खासगी इस्पितळात ही योजना लागू होणार आहे.

या पॅकेजमध्ये प्रवेश शुल्क, इंटेंसिव्हिस्ट, प्राथमिक आणि तज्ज्ञ सल्लागार शुल्क, बेड शुल्क, नर्सिंग, निवासी डॉक्टर, आहार, कर्मचार्‍यांसाठी पीपीई कीट, एक्स-रे, ईसीजी, यूएसजी, २ डी इको, कार्डियक मॉनिटर, इन्फ्यूजन पंप आदींचा समावेश आहे.