दिशा रवीला जामीन मंजूर

0
185

टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने दिलासा देत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात एक टूलकिट स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केली होती.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवी हिला बंगळुरूतील तिच्या घरी अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती.