दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास कडक कारवाई

0
4

विद्यालयांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील विद्यालयांना दिला आहे.दिव्यांगांसाठीचा कायदा 2016 मधील कलम 16 नुसार त्यांना प्रवेश देणे बंधनकारक असून, कुठलेही विद्यालय त्यांना प्रवेश नाकारू शकत नाही. दिव्यांगांना सर्वसामान्यांसाठीच्या विद्यालयात सामावून घेतले जावे, यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे, असे गोवा शालांत मंडळाने स्पष्ट केले आहे. एखादा विद्यार्थी हा दिव्यांग असेल, तर तो दिव्यांग आहे या कारणासाठी त्याला विद्यालयात प्रवेश देण्यास विद्यालय व्यवस्थापन नकार देऊ शकत नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. जी विद्यालये दिव्यांगांना प्रवेश देण्यास नकार देतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे. यासंबंधीचे परिपत्रक विद्यालयांनी सर्वांना दिसू शकेल अशा जागेवरील आपल्या नोटीस बोर्डवर लावावे, अशी सूचनाही मंडळाने विद्यालयांना केली आहे.