दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी झाले. स्विस एअरलाइन्सचे हे विमान शनिवारी रात्री 1:08 वाजता टेकऑफ करणार होते. तेव्हा त्याचे एक इंजिन निकामी झाले आणि त्याला आग लागली. त्यानंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले. यावेळी सर्व प्रवाशांना रनवेवर आपत्कालीन स्लाइडचा वापर करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेत 6 प्रवासी जखमी झाले आहेत. हे विमान स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणार होते. स्विस एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला दिल्लीतील या विमानात बिघाड झाला. विमान टेकऑफ करण्यासाठी धावपट्टीवर येताच, विमानाच्या डाव्या बाजूच्या लँडिंग गिअरमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर लगेचच फ्लाइट थांबवण्यात आली. या घटनेमागील कारणे पूर्णपणे समजून घेण्यासाठी आमचे पथक लवकरच दिल्लीला जाईल.