मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल रात्री नवी दिल्लीहून गोव्यात परतले. या भेटीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दिल्ली दौर्यात विविध विषयांवर बैठका पार पडल्या, असे मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर सांगितले.मंगळवारी रात्री मुख्यमंत्री तातडीने नवी दिल्लीला रवाना झाले होते.