दिल्लीत सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाने एकही मृत्यू नाही

0
42

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून सलग तीन दिवस दिल्लीत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत एकून २५ हजार ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासांत दिल्लीत २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीत कोरोना वाढीचा दर हा ०.०४ टक्क्‌यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता ३९८ वर पोहोचली असून ही वर्षभरातील सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद आहे. सध्या १२९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.