दारू दुकानासंबंधीचा अहवाल समिती आज सादर करणार

0
56

राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५०० मीटर अंतरापर्यंत असलेली दारूविक्रीची दुकाने एप्रिल महिन्यापासून बंद करण्यात यावीत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा दारू दुकानांची यादी तयार करण्यासाठी दर एका तालुक्यात मामलेदार अथवा संयुक्त मामलेदार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समित्या यासंबंधीचा आपला अहवाल आज २८ रोजी अबकारी खात्याला सादर करणार आहेत.

या समित्यांना आपला अहवाल दि. २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे सर्व बाराही तालुक्यांतील समित्या आपला अहवाल आज सादर करतील, अशी खात्याला अपेक्षा असल्याचे अबकारी खात्याचे आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी काल सांगितले. आम्ही ह्या समित्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपला अहवाल सादर करण्याची सूचना केली होती, असे श्री. डिसोझा यांनी सांगितले. या समित्यांकडून आम्हाला कामासंबंधीची दैनंदिन स्वरूपाची माहिती दूरध्वनीवरून देण्यात येत असे, अशी माहितीही डिसोझा यांनी दिली.राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून एकूण किती दारू विक्री दुकाने ५०० मीटरपर्यंत आहेत हे शोधून त्यांची यादी करण्याची जबाबदारी प्रत्येक तालुक्यातील समितीवर सोपवण्यात आली असल्याची माहिती श्री. डिसोझा यांनी दिली.
अधिवेशनावरील याचिकेवर सुनावणी
कायदा आहे त्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, वरील प्रकरणी सरकारला चुकीचा सल्ला देणारे ऍडव्होकेट जनरल सरेश लोटलीकर यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही काल ऍड. रॉड्रिगिस यांनी यावेळी केली.