दहा राज्यांतील पोटनिवडणूक शांततेत

0
92

एकुण दहा राज्यांत मिळून ३ लोकसभा व ३३ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक काल शांततेत पार पडली. सर्व जागांचा विचार करता मतदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्यादृष्टीनेही या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पोट निवडणूक झालेल्या तीन लोकसभा जागांत वडोदरा (गुजरात), मैनपुरी (उत्तर प्रदेश) व मेढक (तेलंगणा) या जागांचा समावेश होता. येथे अनुक्रमे ४९, ५६, व ६७ टक्के मतदान झाले. मैनपुरी मतदारसंघात मुलायम यांच्या घराण्यातील तरुण चेहरा तेज प्रताप सिंग यादव रिंगणात आहे. वडोदरा हा मोदींनी सोडलेला मतदारसंघ असून तेलंगणात भाजप-टीआरएस अशी लढत आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील ११ जागांसाठी ५३ टक्के, गुजरातमध्ये नऊ मतदारसंघासाठी४९ टक्के, राजस्थानच्या चार जागांसाठी ६६ टक्के, पश्‍चिम बंगालमधील दोन जागांसाठी ७९.५९ टक्के, छत्तिसगढमध्ये एका मतदारसंघात ५० टक्के, आसाममधील तीन मतदारसंघात ७० टक्के तर त्रिपुरातील एका जागेसाठी ८७ टक्के मतदान झाले. आंध्रातील एका जागेसाठी ६८ टक्के मतदान झाले.
मतमोजणी १६ सप्टेंबर रोजी होणार आहे.