>> वेळापत्रकामध्ये किंचित बदल
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविडच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्यासाठी मंडळाने शैक्षणिक संस्था प्रमुख, परीक्षा नियंत्रकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहावी, बारावीच्या मुलांना परीक्षा केंद्र, उपकेद्रांपर्यत सोडणे आणि परत आणण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, प्राचार्यावर सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेत सामाजिक अंतर, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा सभागृहाची साफसफाई करावी. विद्यार्थ्यांना परीक्षा सभागृहात पाण्याची बाटली, सॅनिटायझर्स आणि मास्क परिधान करण्यास मान्यता द्यावी, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.
परीक्षा केंद्र, उपकेंद्राच्या २०० मीटरच्या परिघात पालकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी परीक्षेच्या आसन व्यवस्थेबाबतची स्लिप प्रत्येक विद्यार्थ्याला दिली पाहिजे. त्यात परीक्षा केंद्र, उपकेंद्राचे नाव, आसन क्रमांक, ब्लॉक क्रमांक, मजला क्रमांक आदींची माहिती दिली पाहिजे. संस्था प्रमुखांनी वरील माहिती परीक्षा नियंत्रकाकडून घेतली पाहिजे.
विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर सुलभरीत्या जाण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना ब्लॉकनिहाय एकामागून एक अशा पद्धतीने बाहेर जाण्यास मान्यता दिली जाणार आहे. स्वयंसेवक सामाजिक अंतराचे पालन करून मुलांना स्कूल बसपर्यत जाण्यासाठी मदत करतील.
परीक्षा केंद्र नियंत्रकांनी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयातील स्वयंसेवकांची मदत घ्यावी, विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी तीन जणांची टीम नियुक्त करावी. त्यांच्याकडे ग्लुकोज, पाण्याची लहान बाटली, मास्क, सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावा. गरज भासल्यास विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात. या टीमचा प्रमुख गरज भासल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्याची मदत घेऊ शकतो. परीक्षा केंद्राजवळ उच्च माध्यमिक विद्यालय नसल्यास जवळच्या माध्यमिक विद्यालयातील स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. उच्च माध्यमिक विद्यालयातील जास्त स्वयंसेवक उपलब्ध होत असल्यास त्याचा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांत मार्गदर्शन करण्यासाठी वापर करावा, असे सूचनेत नमूद केले आहे.
परीक्षेपासून एकही विद्यार्थी
वंचित राहणार नाही ः मुख्यमंत्री
दहावी, बारावीच्या परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. सीमाभागांतून येणार्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक ठिकाणी परीक्षा केंद्रे स्थापन केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण खात्याच्या अधिकार्यासोबत चर्चा केली असून केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. काणकोण, पेडणे, डिचोली, सत्तरी आदी भागात सीमाभागांतून येणार्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खास परीक्षा केंद्रे सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राबाबत माहिती जाहीर केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत परीक्षा
पुढे ढकलणार नाही
परीक्षा कुठल्याही परिस्थितीत पुढे ढकलली जाणार नाही. एखाद्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली तरीही परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. संबंधित मुख्य केंद्रावर परीक्षा स्थळ, उपकेंद्राची माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा सुरू होऊन ३० मिनिटे झाल्यानंतर विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्यासाठी मान्यता दिली जाणार नाही.
दहावी
दिनांक वेळ विषय
गुरुवार
२१ मे सकाळी
९ ते ११ प्रि-व्होकेशनल विषय
बेसिक कुकरी
शुक्रवार
२२ मे सकाळी
९ ते ११ एनएसक्यूएफ विषय
टेलरिंग अँड कटिंग
होम व्हेजिटेबल गार्डन्स
शनिवार
२३ मे सकाळी
९ ते ११.३० प्रथम भाषा
इंग्रजी/मराठी/ऊर्दू
प्रथम भाषा (सीडब्ल्यूएसएन)
मंगळवार
२६ मे सकाळी
९ ते ११.३० गणित
बुधवार
२७ मे सकाळी
९ ते ११.३० द्वितीय भाषा ः
हिंदी/फ्रेंच
गुरुवार
२८ मे
सकाळी
९ ते १०.३० तृतीय भाषा ः
इंग्रजी, कोकणी, मराठी, ऊर्दू, संस्कृत, कन्नड इ.
शुक्रवार
२९ मे सकाळी
९ ते १०.३०
९ ते ११.३० सोशल सायन्स पेपर १
इतिहास व राज्यशास्त्र
शनिवार
३० मे सकाळी
९ ते १०.३०
९ ते ११.३० सोशल सायन्स पेपर २
भूगोल व अर्थशास्त्र
सोमवार
१ जून स.९ ते ११.३०
९ ते १२ विज्ञान
सर्वसाधारण विज्ञान
मंगळवार
२ जून सकाळी
९ ते ११ ड्रॉईंग अँड पेंटिंग
बुधवार
३ जून सकाळी
९ ते ११ वर्ड प्रोसेसिंग
गुरुवार
४ जून सकाळी
९ ते ११ बेसिक फ्लोरीकल्चर
शुक्रवार
५ जून सकाळी
९ ते ११ फंडामेंटल्स ऑफ बेकरी
शनिवार
६ जून सकाळी
९ ते ११ डेस्क टॉप पब्लिशिंग
बारावी
दिनांक वेळ विषय
बुधवार
२० मे स. ९ ते ११.३०
स. ९ ते १२ मराठी भाषा २
मराठी भाषा २ सीडब्लूएसएन
गुरूवार
२१ मे स. ९ ते ११.३०
९ ते १२ राज्यशास्त्र
राज्यशास्त्र सीडब्लूएसएन
शुक्रवारी
२२ मे स. ९ ते ११.३० भूगोल,
भूगोल सीडब्लूएसएन