दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर

0
4

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने कालपासून उपलब्ध केला आहे.
शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. गेल्या नोव्हेंबर 2022 मध्ये दहावीची पहिली सत्र परीक्षा घेण्यात आली होती. मंडळाने संकेतस्थळावर परीक्षेतील प्रतिसाद पत्रक उपलब्ध केले आहे. त्यात मंडळाने मंडळाने प्रश्नांची उत्तर दिली आहेत. ही उत्तरे आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरे दोन्ही पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिसाद पत्रकात काही त्रुटी असल्याचे आढळल्यास त्याबाबत ऑनलाइन पद्धतीने दावा केला जाऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याकडून 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दावा योग्य असल्याचे आढळून आल्यास शुल्क परत केले जाणार आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत उत्तरपत्रिकेतील त्रुटींबाबत दावा केला जाऊ शकतो, असे मंडळाने कळविले आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या सत्र परीक्षेची वेगळी गुणपत्रिका दिली जाणार नाही, तर दुसऱ्या सत्र परीक्षेनंतर दोन्ही सत्राची मिळून एकच गुणपत्रिका दिली जाणार आहे.