दहावीच्या परीक्षेस १३ मेपासून प्रारंभ

0
146

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा १३ मे २०२१ ते ४ जून २०२१ दरम्यान घेतली जाणार आहे. ही परीक्षा नियमित, पूर्व व्यावसायिक, एनएसक्यूएफ आणि सीडब्ल्यूएसएन विषयासाठी घेतली जाणार आहे. सुरुवातीला पूर्व व्यावसायिक विषयाची परीक्षा होणार आहे. १९ मे ते २ जून दरम्यान प्रमुख विषयांची परीक्षा होईल. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेसाठी योग्य वेळी एसओपी जाहीर केली जाणार आहे.