दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोना विषाणूचा नवा प्रकार

0
44

जगातील सर्व देश सध्या कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा सामना करत आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. सी.१.२ हा नवीन प्रकार अत्यंत संसर्गजन्य असू शकतो. तसेच कोरोनावरील लसीपासून मिळणार्‍या प्रतिकारशक्तीलाही हा प्रकार चकवा देऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेत मे महिन्यात हे प्रमाण ०.२ टक्के होते. ते प्रमाण जूनमध्ये १.६ टक्के आणि जुलै महिन्यात २ टक्के झाले आहे.